नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरफोड्या करणा-या दोघांपैकी एकास जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन व दुस-यास दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. संशयितांच्या अटकेने दोन घरफोड्या उघडकीस आल्या होत्या. हे खटले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट न.८ च्या न्या. मनिषा कुलकर्णी यांच्या कोर्टात चालले. सिडकोतील वेगवेगळया भागात हा घरफोड्या झाल्या होत्या.
अभिषेक उध्दव विश्वकर्मा (२४ रा.स्वामीनगर,अंबड) व योगेश उत्तम वडनेरे (३२ रा.आयशा अपा.पिंपळगाव ब.ता.निफाड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या वर्षी १८ जानेवारी रोजी रात्री सिडकोतील छगन बाबु भोजणे (रा.महाराणा प्रताप चौक) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील रोकडसह दागिणे असा १ लाख ३६ हजार ५४८ रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. यापाठोपाठ २७ ते २९ जानेवारी दरम्यान अचानक चौकातील सिडको कॉलनीत घरफोडीची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड सा सुमारे १ लाख ५८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी शशिकला दामोदर गायकवाड यानी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुह्यांचा तपास हवालदार जे.डी.परदेशी आणि पोलीस नाईक डी.एस.महाजन यांनी केला. दोन्ही खटले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.८ च्या न्या. मनिषा कुलकर्णी यांच्या कोर्टात चालले. सरकारतर्फे दोन्ही खटल्यात अॅड. शैलेंद्र बागडे यांनी काम पाहिले. न्यायालयाने दोन्ही गुह्यातील फिर्यादी साक्षीदार व पंचानी दिलेली साक्ष व तपासी अधिकाºयांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपी अभिषेक विश्वकर्मा यास प्रती गुन्हा तीन वर्ष सश्रम कारावास व २० हजाराचा दंड तर योगेश वडनेरे यास प्रती गुन्हा दोन वर्ष सश्रम कारावास आणि प्रती गुन्हा पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.