नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावासाठी मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी सरपंचाकडून २२ हजार ५०० रुपयाची लाच घेतांना अहमदनगर जिल्हा परिदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक संतोष जाधव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
या कारवाईबाबात एसीबीने सांगितले की, तक्रारदार २०२१ पासून अहमदनगर जिल्ह्यातील जांभळी गावच्या सरपंच आहेत. त्यांचे गावासाठी सभा मंडपाकरिता आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सदर कामास नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी प्रशासकीय मान्यता देऊन सदर कामाची वर्क ऑर्डर देण्याकरिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्याकडे सादर केलेले असून अद्याप वर्क ऑर्डर मिळालेली नाही.
सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर येथील लिपिक जाधव यांनी सभा मंडपाचे कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के रक्कम २३ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार १ डिसेंबरला प्राप्त झाली होती, त्यानुसार आज १ डिसेंबरला जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक संतोष बाळासाहेब जाधव यांनी तक्रारदार यांचे सोबत त्यांचे पती असताना तक्रारदार यांचे पतीकडे जांभळी गावासाठी मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देणे करिता पंचासमक्ष २३ हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती २२ हजार ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे सापळा आयोजित केला असता यातील आरोपी लोकसेवक जाधव यांनी तक्रारदार यांचे पतीकडून पंचासमक्ष २२ हजार ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी जाधव यांचे विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
यशस्वी सापळा अहवाल
*युनिट – अहमदनगर
*तक्रारदार- स्त्री, वय- ३३ वर्ष,
रा. जांभळी, ता-पाथर्डी, जि.अहमदनगर
*आरोपी = संतोष बाळासाहेब जाधव, वय ३९ वर्ष, धंदा- नोकरी,
कनिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग जिल्हा परिषद, अहमदनगर जि.अहमदनगर
राहणार- विद्या कॉलनी, कल्याण रोड, अहमदनगर जिल्हा- अहमदनगर.
*लाचेची मागणी-* २३०००/- ₹ तडजोडीअंती २२,५००/- ₹
लाच स्विकारली २२५००/ ₹
हस्तगत रक्कम- २२५००/-रु
लाचेची मागणी – ता.०१/१२/२०२३
लाच स्विकारली –ता. ०१/१२/२०२३
लाचेचे कारण -.तक्रारदार ह्या सन २०२१ पासून जांभळी गावच्या सरपंच आहेत. त्यांचे गावासाठी सभा मंडपाकरिता आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सदर कामास नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी प्रशासकीय मान्यता देऊन सदर कामाची वर्क ऑर्डर देण्या करिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्याकडे सादर केलेले असून अद्याप वर्क ऑर्डर मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर येथील लिपिक जाधव यांनी सभा मंडपाचे कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के रक्कम २३,०००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्राप्त झाली होती, त्यानुसार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक संतोष बाळासाहेब जाधव यांनी तक्रारदार यांचे सोबत त्यांचे पती असताना तक्रारदार यांचे पतीकडे जांभळी गावासाठी मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देणे करिता पंचासमक्ष २३०००/- रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती २२,५००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे सापळा आयोजित केला असता यातील आरोपी लोकसेवक जाधव यांनी तक्रारदार यांचे पतीकडून पंचासमक्ष २२५००/- रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपी लोकसेवक जाधव यांचे विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
सापळा अधिकारी:-
प्रविण लोखंडे,
पोलीस उप अधीक्षक,
ला.प्र. वि. अहमदनगर
मो न 8007679900
सहाय्यक सापळा अधिकारी* राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-:9420896263
सापळा पथक:- पो हे कॉ संतोष शिंदे, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, चालक पो हे कॉ. हारुन शेख,