इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी२० सामन्यात पराभव करुन पाच सामन्यांची मालिका जिंकली. या अगोदर भारताने दोन सामने जिंकले होते. हा सामना २० धावांनी जिंकत या मालिकेत ३-१ अशा फरकाने आघाडी घेतली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १७५ धावांचे आव्हान दिले होते. पण, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट गमावत १५४ धावाच केल्या. आता मालिकेतील पाचवा सामना हा रविवारी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या चौथ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलिया संघाची दमछाक झाली. या सामन्यात अक्षर पटेल याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहर याने दोन तर आवेश खान आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताला बॅटिंगची संधी दिली. त्यानंतर भारतीय संघाने २० षटकात ९ गडी गमावत १७४ धावा केल्या. रिकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड यांनी ३२ धावा केल्या. जितेशही ३५ रन्स केले. उपकर्णधार श्रेयस अय्यर झटपट आऊट झाला. श्रेयसने ८ धावा जोडल्या. श्रेयसनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवही फक्त १ धावा घेऊन बाद झाला.