मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राष्ट्रवादी काँग्रेस चें पदाधिकारी शिबीर कर्जत येथे संपन्न झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना १३६९ गुलाबपुष्प यांनी बनविलेला आणि १५० किलो वजन असलेला जगातील सर्वाधिक मोठा पुष्पगुच्छ देऊन अजित दादांना सन्मानीत करण्यात आले. या गुच्छाची नोंद इंटर नॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स ” या मध्ये करण्यात आली आहे.
१५० किलो वजनाचा आणि १३६९ गुलाब फुलांनी बनविलेला हा पुष्प गुच्छ हा जगातील सर्वात मोठा पुष्प गुच्छ असल्याने त्याची विश्व विक्रमी नोंद “इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स ” मध्ये करण्यात आली आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स ” मध्ये केली आहे.
अजित पवार यांना हा गुलाब पुष्प गुच्छ १८० वेळा विश्व विक्रम करणारे डॉ. दीपक हरके व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचें प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, मंत्री अनिल पाटील, मंत्री बाबा आत्राम, मंत्री संजय बनसोडे, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे,प्रदेश युवक चें अध्यक्ष सूरज चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाल्याचे सर्टिफिकेट या संस्थेचे लंडन येथील चेअरमन डॉ. दिवाकर सुकूल हे पुढील आठवड्यात मुंबईत येऊन अजित दादांना प्रदान करतील. हा विश्व् विक्रमी गुलाब पुष्प गुच्छ देण्यामागील भूमिका स्पष्ट करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचें प्रदेश प्रवक्ते ताराचंद म्हस्के पाटील म्हणाले, अजित दादा पवार हे राज्याचे कणखर नेतृत्व असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, अल्प संख्याक, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात त्यामुळेच राज्यातील जनतेला अजित दादा हे रयतेच्या मनातील मुख्यमंत्री वाटतात. विकास कामांची प्रचंड उरक असल्याने त्यांचे नेतृत्व गुलाब फुलांच्या सुगंधा प्रमाणे राज्यभर दरवळत रहावे याच हेतूने सर्वात मोठा गुलाब पुष्प तयार करण्यात. आज ना उद्या तें मुख्यमंत्री नक्की होतील अशी ही भावना सर्वत्र आहे.