दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध उभे रहा. ज्याच्यावर अन्याय झाला त्या मागे जा म्हणून शिकवण दिली आहे. पण काहीजण सत्तेत गेले अन ते पंचतारांकित हॉटेल मध्ये बैठका घेत आहे. तर आम्ही शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना भेटून जाणून घेत आहोत. आर्थिक तिजोरी तुमच्याकडे कृषिमंत्री पद तुमच्याकडे मग का शेतकऱ्यासाठी तिजोरी मोकळी का करत नाही असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, कुटुंबातील काही गोष्टी चर्चा कुटुंबात ठेवायच्या असतात त्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात हे चांगल्या मुलाचे लक्षण नाही असे सांगत त्यांनी असा अजित दादा पवार यांना चिमटा घेतला. कर्जत येथे पक्षांतर्गत चर्चा बाबत केलेल्या गौप्य स्फोटाचे पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या सरकार मध्ये एकवाक्यता नाही मुख्यमंत्री वेगळे बोलतात तर यांचे मंत्री वेगळेच बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मराठा ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
नरहरी झिरवाळ यांचेबाबत चुप्पी
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अजित दादा पवार यांचेसोबत गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरीत काय रणनीती करणार झिरवाळ यांचेबाबत काय वक्तव्य करणार याची उत्कंठा होती. मात्र जयंत पाटील यांनी झिरवाळ यांचे बाबत कोणतेही वक्तव्य न करता केवळ केंद्र व राज्य शासनाचे कारभारावर टीका केली.