नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी तारीख देण्याचे मोबदल्यात १५०० रुपयाची लाच घेताांना चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायक अंजीनाथ बाबुराव रसाळ हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अ़डकले. अगोदर तीन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५०० रूपये घेतांना ते रंगेहात पकडले.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती असून सदर शेतजमिनीची मोजणी करणेकरिता तारीख देण्याचे मोबदल्यात अंजीनाथ रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडे १ डिसेंबर रोजी तीन हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५०० रूपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर चांदवड पोलीस स्टेशन ,नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
*युनिट -* ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 30 वर्ष.
*आलोसे – अंजीनाथ बाबुराव रसाळ, वय- 50 वर्षे, व्यवसाय-नोकरी, मुख्यालय सहायक, पद- वर्ग 3, भूमी अभिलेख कार्यालय चांदवड ता चांदवड जिल्हा- नाशिक
*लाचेची मागणी- दिनाक 01/12/2023 3000/- रुपये तडजोडीअंती 1500/- रूपये
*लाच स्वीकारली – दिनांक 1/12/2023 रोजी 1500/- रुपये स्वीकारले
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेती असून सदर शेतजमिनीची मोजणी करणेकरिता तारीख देण्याचे मोबदल्यात आलोसे रसाळ यांनी तक्रारदार यांचेकडे दिनाक 1/12/2023 रोजी 3000 रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1500 रूपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांचेवर चांदवड पोलीस स्टेशन ,नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
*आलोसे यांचे सक्षम- मा.उपसंचालक भूमिअभिलेख, नाशिक प्रदेश ,नाशिक
*सापळा अधिकारी – परशुराम कांबळे,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक -पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक