इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – महात्मा गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहिम हाती घेतलेली असतांना त्याअगोदरच सप्ताहाच्या पूर्वसंध्येस राज्य उत्पादन शु्ल्क विभागाच्या पथकाने महामार्गावरील ढाव्यावर छापा टाकला. या ठिकाणी नऊ तळीरामांसह त्यांना सुविधा पुरविणा-या दोन व्यावसायीकांवर दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे साडे तीन हजाराचा मुद्देमाल हस्तगत
राज्यभरात २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान सर्वत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह पाळला जात आहे. त्याच पार्श्वभूमिवर राज्य उत्पादन शुल्कच्या ब विभागाच्या भरारी पथकाने महामार्गावरील वाडिव-हे ते विल्होळी दरम्यानच्या ढाब्यांमध्ये छापा सत्र राबविले. या कारवाईत ९ तळीराम आाणि त्यांना बेकायदा सुविधा पुरविणारे दोन ढाबा व्यावसायीक पथकांचे हाती लागले आहेत. संशयितांच्या ताब्यातून सुमारे ३ हजार ५२० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक सुनिल देशमुख व निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक पी.बी.ठाकुर, धिरज जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप जवान संतोष कडलग,अमित गांगुर्डे,दुर्गादास बावस्कर चालक राकेश पगारे,विरेंद्र वाघ आदींच्या पथकाने केली.