नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूर जत्रा लिंक रोडवरील एका हॉटेल चालका विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना नसतांना दारू सेवन करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे हॉटेल चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा केली आहे.
अजिंक्य अशोक माळोदे (रा.डावखरवाडी,ना.रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हॉटेल चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी अमोल देशमुख यांनी फिर्याद दाखल केली आहे.
माळोदे यांच्या हॉटेल कौशल्या येथे पोलिसांनी छापा टाकला असता काही ग्राहक दारू सेवन करतांना आढळून आले. परवाना नसतांना मद्यपानासाठी ग्राहकाना जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी माळोदे यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.