माणिकराव खुळे
- कोकण -मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात फक्त आजच ढगाळ वातावरण असून उद्या शनिवार २ डिसेंबर पासून पूर्णतःतेथे उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल.
- मध्य महाराष्ट्र- खान्देश, नाशिकसह सोलापूर पर्यंतच्या १० जिल्ह्यात आज व उद्या (शुक्रवार, शनिवार १,२ डिसेंबर)पर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परंतु परवा रविवार दि.३ डिसेंबर पासून तेथे पूर्णतः उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल.
- मराठवाडा – मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात आज १ तसेच ४,५ डिसेंबर (शुक्रवार, सोमवार, मंगळवार ) असे तीन दिवस फक्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. बुधवार दि.६ डिसेंबर पासून पासून पूर्णतः उघडीप व स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल.
- विदर्भातील ११ जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील ५ दिवस म्हणजे मंगळवार दि.५ डिसेंबर पर्यन्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. तेथेही बुधवार दि.६ डिसेंबर पासून पूर्णतः उघडीपव स्वच्छ सूर्यप्रकाशजाणवेल.
२- सोमवार दि.४ डिसेंबरला तामिळनाडू व आंध्र किनार पट्टी सीमावर्ती भागात आदळणारे ‘ मिचोंगं ‘ नावाचे सौम्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही विशेष वातावरणीय परिणाम जाणवणार नाही.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd.)
IMD Pune.