इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गुगल मॅपने रस्ता चुकवल्याचे प्रत्येकांनी अनुभवले आहे. त्यामुळे ही गोष्ट नवीन नाही. पण, गुगल मॅपमुळे गाडी घराकडे जाण्याएेवजी थेट नदीत पोहचली व त्यात दोन डॅाक्टरांना जीव गमवावा लागला. ही घटना आहे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथुरुथ भागातील आहे. रविवारी ही घटना समोर आली. यात डॉ.अद्वैत, डॉ. अजमल आसिफ यांचा मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील अन्य तीन जण स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले.
डॅा. अदवैत यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करून घरी जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. वाचलेल्यांपैकी एक, डॉ. गाजिक थबसीर यांनी या अपघाताचे कारण सांगितले. हो आम्ही गुगल मॅप वापरत होतो. पण, रस्ता चुकीचा दाखवल्यामुळे मध्यरात्री आम्ही नदीत पोहचलो व तेथे ही घटना घडली.
होंडा सिविक कारमधून हे पाचही मित्र प्रवास करत होते. मध्यरात्री रस्ता कळत नसल्याने त्यांनी गुगल मॅपचा वापर केला. पण, गुगल मॅपने दाखवलेल्या रस्तयाने रस्त्याने ते थेट नदीत पोहोचले. या ठिकाणी कार पाण्याने नदीत बुडाली. या घटनेत दोघेही कारसह नदीत बुडाले. सुदैवाने कारमधील अन्य तीन जण स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाले.