इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मणिपूरमधील उखरुल शहरात गुरुवारी पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेवर दरोडा टाकून चोरट्यांनी तब्बल १८ कोटी ८५ लाख लंपास केले. या मोठ्या लुटीमुळे राज्यात खळबळ निर्माण झाले आहे. अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी उखरुल येथील पीएनबी शाखेवर हा दरोडा टाकला.
बँकेत दुपारी ८ ते १० सशस्त्र दरोडेखोरांनी उखरुल शहरातील व्हूलॅड १ येथे शाखेत ही लुट केली. कर्मचारी दिवसभराच्या व्यवहाराचे काम संपवत असतांना हे दरोडेखोर बँकेत आले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा कर्मचारी व बँकेच्या कर्मचा-यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना ताब्यात घेतले. या दरो़डेखोरांकडे अत्याधुनिक शस्त्र होते.
दरोडा टाकतांना या दरोडेखोरांनी सुरक्षा व बँक कर्मचा-यांना दोरीने बांधल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर रोख रक्कम घेऊन ते पळून गेले. त्याअगोदर त्यांनी कर्मचा-यांना स्टोअर रुममध्ये बंद केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस बँकेत गेले. त्यानंतर त्यांनी या दरोडेखोरांना शोधण्यासाठी पथक तयार करुन शोध सुरु केला. या दरोडेप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेबद्दल एक ट्विट निरंजजीत युमनाम यांनी केले आहे.