इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आज आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी बारामती, सातारा, रायगड, शिरुर या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे सांगितले. अजून काही जागा चर्चा करुन लढवू असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी ५ राज्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यावर त्यावर एकत्रित चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.विकासकामे व्हावे हीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. महिलांसाठी केंद्र व राज्याच्या अनेक योजना चांगल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आपल्यावर झालेल्या आरोपांचेही खंडण केले. आरोप सिध्द व्हावे लागतात असेही त्यांनी सांगितले. केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. बघा संपूर्ण भाषण