नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई- आग्रा महामार्गावर आठवा मैला जवळ झालेल्या अपघातात टेम्पो पलटी झाला आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला.
मुंबई कडून नाशिककडे जाणा-या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान ची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली व चालकाला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.