इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – पुणे महामार्गावर क्रुझरने पाठीमागून टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला.
या अपघातात पंकज खंडू जगताप (३६) , मधुकर तुकाराम अहिरे (५२) शांताराम संभाजी आहिरे (५०) रा. जायखेडा ता. सटाणा यांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमींना मंचर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ हा अपघात झाला. पहाटे धुके जास्त असल्यामुळे क्रुझरला समोरचा टेम्पो दिसला नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघाता क्रुझरचा पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. पाोलिसही घटनास्थळी दाखल झाले.