इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिक्षकाने आपल्या पत्नी व मुलाची हत्या करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना महाराष्ट्रात ताजी असतांना उत्तरप्रदेशमधील कानपूर येथे शिक्षकाच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने शिक्षकाचा सुपारी देऊन खूनाचा कट केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हा शिक्षक सरकारी शाळेत नोकरीला होता. पण, तो प्रॅापर्टीचे काम सुध्दा करायचा. त्यामुळे वडीलोपार्जित संपत्ती बरोबरच त्याची अशी ४५ कोटीची त्याची संपत्ती होती. त्यावर या पत्नीचा डोळा होता. त्याचबरोबर त्याने ३ कोटीची विमा पॅालीसी काढली होती. त्यामुळे त्याची पत्नी पिंकीची त्यावरही नजर होती.
या दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले होते. त्यात त्याचा संसारही चांगला चालला होता. पण, यात विघ्न आले. ते राजेशने आपल्या प्लॅाटच्या बांधकामाचे काम सुरु केल्यानंतर. हे बांधकाम त्याने शैलेंद्र सोनकर याला दिले. त्यानंतर त्याचे घरी येणे जाणे सुरु झाले. पत्नी पिंकी दिसायला सुंदर असल्यामुळे शैलेंद्रची नजर तिच्यावर गेली. त्यानंतर दोघांचे प्रेम जुळले. ही गोष्ट राजेशला लक्षात आल्यानंतर त्याने शैलेंद्रला घरी येण्यास मनाई केली. यावरुन पिंकी व राजेशमध्ये भांडण सुरु झाले. त्यानंतर तीने राजेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. अगोदर तीने जेवणातून वीष देण्याचा प्रयत्न केला. पण, तो तीचा डाव यशस्वी झाला नाही.
त्यानंतर तीने प्रियकर शैलेंद्रबरोबर खूनचा कट रचला. राजेश मॅार्निगं वॅाकला जातो. हे तीने शैलेंद्रला सांगून त्याचा अपघात करण्याचा प्लॅन केला. पिंकी व शैलेंद्रने त्यासाठी चार लाखाची सुपारी दिली. त्यानंतर राजेशला कारने चिरडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना झाल्यानंतर पोलिसांनी हा अपघात असल्याचे या घटनेकडे बघितले. पण, राजेशच्या भावाने या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर त्यांना शंका आली. त्यांनी पिंकीचे कॅाल डिटेल्स चेक केल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी पिंकी व तीचा प्रियकर शैलेंद्र या दोघांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरु आहे.