इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडारदरा येथे जखमी बिबट्याला वनविभागने रेस्क्यू करुन त्याला शासकीय वाहनाने नाशिक येथे पुढील उपचारासाठी इको इको या संस्थेत दाखल केले. हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे वय ५ ते ६ महिन्याचे असल्याचे वनविभागाने सांगितले.
या रेस्क्यू ऑपरेशन बाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की, इगतपुरी वनक्षेत्रातील वनपरिमंडळ भंडारदरा वाडी नियतक्षेत्र भंडारदरावाडी मधील मौजे-पिंपळ गाव डुकरा समृद्धी हायवे लगत बिबट वन्यप्राणी गंभीर जखमी व एका खड्यात अडकला होता. त्या अवस्थेत निदर्शनास आल्याने फोनवरुन माहिती मिळाली. त्यानंतर या ठिकाणी जाऊन रेस्क्यू साधन समुग्रीच्या साह्याने physical rescue करण्यात आले.