इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना संघ व्यवस्थापनाने धक्कातंत्र वापरले आहे. ‘बीसीसीआय’चे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी तीन प्रकारच्या संघाची घोषणा केली. विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याच्या फिटनेसवर त्याची निवड अवलंबून आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताल तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. टी-२०ची कमान सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. एक दिवसीय मालिकेची धुरा के. एल. राहुलकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मावर कसोटी संघाची धुरा आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि वनडेमधून ब्रेक घेतला आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना दहा डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा टी-२० सामना १२, तर तिसरा टी-२० सामना १४ डिसेंबरला होणार आहे. १७ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यातील पहिला सामना जोहान्सबर्ग, दुसरा सामना १९ ला, तर तिसरा सामना २१ तारखेला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून तर दुसरा सामना तीन जानेवारीपासून होणार आहे.
भारताचा टी-२० संघः सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश, वॉशिंग्टन सुंदर, बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर
एकदिवसीय संघः केएल राहुल (कॅप्टन तसेच विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
कसोटी संघः रोहित शर्मा (कॅप्टन), बुमराह (उपकप्तान), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकिपर), के. एल, राहुल (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा