इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली -संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतली संसदेच्या ग्रंथालय भवन इथे ही सर्वपक्षीय बैठक होणार आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरू होणार आहे आणि शासकीय कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार हे सत्र २२ डिसेंबर २०२३ पर्यंत चालणार आहे. १९ दिवसांच्या कालावधीत एकूण १५ बैठका होतील.
चार राज्याच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबला आहे. त्यानंतर दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे.त्यामुळे या निवडणुकांच्या निकालाचाही परिणाम या अधिवेशनावर होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका या तोंडावर आल्यामुळे या अधिवेशनात बरेच निर्णय केंद्र सरकार घेईल असे बोलले जात आहे.