नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय ठेकेदाराकडून केलेल्या बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी १ लाख ४ हजार रुपयांची लाच घेतांना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील ग्रामसेवक अनिलकुमार मनोहर सुपे हे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.
या घटनेबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली,त्र्यंबक ग्रामपंचायत अंतर्गत चे. निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्या.मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिकचे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.सदर कामे तक्रारदार यांनी विहित कालावधी मध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली असून २,९९,७७६/- या रकमेचे बिल हे वाढोली,ग्रामपंचायत कडून मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदार हा आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिल बाबत विचारणा करत होता. सदर बिल मंजुर करण्यासाठी ३० हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे. त्याचे बक्षीस म्हणुन ७० हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे ४ हजार रुपये असे एकूण १ लाख ४ हजार रुपयांची ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदार यांच्याकडे २९ नोव्हेंबर रोजी मागणी करून ३० नोव्हेंबर रुपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले. त्यांचेवर सरकार वाडा पोलीस स्टेशन ,नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
युनिट – ला.प्र.वि. नाशिक
तक्रारदार- पुरुष, 36 वर्ष.
आलोसे -1) अनिलकुमार मनोहर सुपे, वय- 46 वर्षे, व्यवसाय-नोकरी, ग्रामसेवक, वाढोली , पद- वर्ग 3 ता.त्र्यंबक जिल्हा- नाशिक
*लाचेची मागणी- 1,04,000/- रुपये 29/11/2023 .
*लाच स्वीकारली- 1,04,000/- रुपये दि. 30/11/2023 रोजी स्वीकारले
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी वाढोली,त्र्यंबक ग्रामपंचायत अंतर्गत चे. निलंबिका मजूर व बांधकाम सहकारी सोसायटी मर्या.मु.पो.आंबोली ता.त्र्यंबक, जिल्हा- नाशिक चे नावे वाढोली गावचे विविध कामे घेतलेली होती.सदर कामे तक्रारदार यांनी विहित कालावधी मध्ये पुर्ण केलेली असून काही कामाची बिले तक्रारदार यास मिळाली असून 2,99,776/- या रकमेचे बिल हे वाढोली,ग्रामपंचायत कडून मिळाले नाही. त्याबाबत तक्रारदार हा आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांच्याकडे बिल बाबत विचारणा करत होता. सदर बिल मंजुर करण्यासाठी 30 हजार रुपये व यापुर्वी तक्रारदार यांनी केलेले कामाचे बिल यापूर्वी मंजूर केलेले आहे त्याचे बक्षीस म्हणुन 70 हजार रुपये, सर्व बिलांचे ऑडिट करण्याचे 4 हजार रुपये असे एकूण 1 लाख 4 हजार रुपयांची आलोसे ,ग्रामसेवक सुपे यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.29/11/2023 रोजी मागणी करून दि.30/11/2023 रुपये घेताना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांचेवर सरकार वाडा पोलीस स्टेशन ,नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
▶️ **आलोसे यांचे सक्षम
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
▶️ *सापळा अधिकारी*
श्री निलिमा केशव डोळस, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.नं. 8108065888
▶️ सापळा पथक–
पोलीस नाईक संदीप हांडगे पोलिस नाईक प्रभाकर गवळी. पोलीस नाईक सुरेश चव्हाण
सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .