नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा गांधी विद्यामंदिर, पंचवटी, नाशिक व आदिवासी सेवा समिती, पंचवटी, नाशिक या दोन्ही संस्थेचे पदाधिकारी अदय प्रशांत हिरे, अपूर्व प्रशांत हिरे, त्याचप्रमाणे संस्थेचे इतर पदाधिकारी व संचालक मंडळ व १० शाळांचे तत्कालिन मुख्याध्यापक यांचेविरुद १ कोटी ५६ लाख रुपये इतक्या शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा भद्रकाली पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला.
अटल टिंकरिंग लॅब (ATL Lab) साठी निती आयोगाकडून ज्या बाबीसाठी अनुदान प्राप्त झाले होते, त्याबाबीवर अनुदान खर्च झाले नाही या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. ज्या उद्देशाने अटल टिंकरिंग लॅब (ATL Lab) ची स्थापना करण्यात आली, त्याचा लाभ विद्याथ्यांना झालेला नाही, यामुळे विद्याथ्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे नुकसान होऊन, विद्यार्थी त्यापासुन वंचित राहिले असेही तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार जिल्हा परिषदेची उपशिक्षणाधिकारी उद्य देवरे यांनी दिली आहे. त्यांनी याबाबात चौकशी केल्यानंतर या बाबी उघड आल्याचे म्हटले आहे.
या तक्रारीत १०/०३/२०१९ ते आज दिनांक २९/११/२०२३ रोजी पावेतो उपरोक्त नमूद वरील १० शाळांचे तत्कालिन मुख्याध्यापक व महात्मा गांधी विद्यामंदिर, पंचवटी, नाशिक व आदिवासी सेवा समिती, पंचवटी, नाशिक या दोन्ही संस्थेचे संचालक अब्दय प्रशांत हिरे, अपूर्व प्रशांत हिरे तसेच सदर संस्थेचे इतर पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी संगनमताने सदर अनुदानाचा गैरवापर करुन आर्थिक अपहार केल्याचे दिसुन आल्याचे म्हटले आहे.