इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तेलंगणाच्या निवडणुकीचे मतदान आज झाल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल समोर आले आहेत. या एग्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राज्याचे निकाल महत्त्वाचे आहेत. ३ डिसेंबराला या सर्व राज्याचे निकाल लागलीत. तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल.
विविध एक्झिट पोलनुसार पाच पैकी एकाच राज्यात भाजपची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर चार राज्यापैकी ३ राज्यात काँग्रेसला जास्त संधी आहे. या पाच राज्यात राजस्थानमध्ये २०० जागा आहे. तर मध्य प्रदेश – २३०, तेलंगणा – ११९, छत्तीसगड – ९०, मिझोरम – ४० जागा आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पुन्हा संधी मिळणार आहे. या ठिकाणी भाजप ३०-३५, काँग्रेस ४०-४५ असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला ९०-१००, भाजप १००-११० तर इतर पक्षांना १० च्या आसपास जागा दाखवल्या आहे.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये आहे. काँग्रेसला १११- १२१, भाजप १०६- ११६ आणि इतर ६ असा अंदाज एक्झिट पोलनुसार सांगण्यात आले आहे. तेलंगणामध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेस ४९-५९, बीआरएस ४८-५८, भाजप ५-१० आणि इतर ६ असा अंदाज वर्तवला आहे. मिझोरम एमएनएफ १५-२१, झेडपीएम – १२-१८, काँग्रेस – २-८ तर इतर पक्षाला पाच जागा दाखवण्यात आल्या आहे.