वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादुर’ १ डिसेंबरला चित्रपटात घरांत प्रदर्शित होणार आहे. इंडियन आर्मी साठी स्वतःचं सर्वस्व झोकून देणारे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावरती आधारीत हा सिनेमा आहे. अभिनेता विकी कौशल यांनी सॅम माणिक शॉ याने सक्षमपणे ही भूमिका मोठ्या पडद्यावरती साकारली असून प्रदर्शनापूर्वीच त्याची खूप चर्चा आहे.
या चित्रपटात १९७१ च्या कालखंडाचे चित्रीकरण केले गेलेले आहे. त्यावेळी भारत पाकिस्तान युद्धाचे बिगुल वाजत असतानाच बांगलादेश निर्मितीचा विषय सुद्धा जोर धरत होता. पंडित नेहरूंच्या नंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान झालेल्या होत्या. त्या संघर्षाच्या काळामध्ये इंदिराजी आणि माणेक शॉ यांना काही धाडसी निर्णय घ्यावे लागले.
माणेक शॉ हे बुद्धिमत्तेने, विचारांनी खूप प्रगल्भ असे व्यक्तित्व होते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शिका मेघना गुलजार यशस्वी झालेल्या आहेत. चित्रपटात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सॅम माणेकशॉ यांचा नातं हे मैत्रीपूर्ण आणि खूप खेळकर अशा पद्धतीने दाखवले गेल्याचे बोलले जात आहे. विकी कौशलने माणेक शॉ यांची भूमिका अभिनयाने जीवंत केली आहे. त्याचा अभिनय या सिनेमामध्ये एका वेगळ्या उंची वरती नेल्याची चर्चा आहे.
या चित्रपटांमध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख हिने इंदिरा गांधीजींची भूमिका साकारून सर्वांनाच आश्चर्यचकित केलेले आहे. तिचा अभिनयाचे सुध्दा कौतुक होत आहे. बाकी कलाकारांमध्ये सानिया मल्होत्रा तसेच इतर कलाकारांनी सुद्धा सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका आहे.