छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बांधकाम क्षेत्रातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर प्राप्तिकर विभागाने आज भल्या पहाटे छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात दोनशे अधिकारी सहभागी झाले होते. आज एकाच वेळी ११ ठिकाणी छापे टाकल्यामुळे ही कारवाई केल्यामुळे बिल्डर्स लॉबीमध्ये खळबळ माजली आहे.
शहरातील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. या बिल्डर्सवर कर चुकवल्याचा आरोप आहे. घर व कार्यालयावर छापे टाकून कराशी संबंधित दस्तावेज पडताळून पाहिले जात आहेत. प्राप्तिकर विभागाने कारवाईबाबत अतिशय गोपनीयता पाळली आहे. ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने संभाजीनगर येथील एका कारखान्यावर छापा टाकून सुमारे २५० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अहमदाबाद येथील शाखेने गुजरात तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली होती.