पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वयं निर्वाही एकक शुल्कच्या शासन मान्य निर्णयानुसार NSS च्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. सुधारित अनुदान २५० वरून ४०० रुपये प्रति विद्यार्थी करण्यात आले. तर विशेष शिबीर अनुदान ४५० वरून ७०० प्रति विद्यार्थी करण्यास काल झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील NSSच्या १६ हजार ५०० विद्यार्थ्यांना तर शिबिरात सहभागी होणाऱ्या ८ हजार २५० विद्यार्थ्यांना यामुळे फायदा होणार आहे. कालच्या बैठकीत NSS च्या कामकाज आणि अनुदानासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सेल्फी विथ माती विश्वविक्रमात भरीव योगदान दिल्याबद्दल NSS आणि विद्यार्थी विकासार्थ विभागांच्या अभिनंदनाचा ठराव व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी मांडला. त्याला बागेश्री मंठाळकर यांनी अनुमोदन दिले. तसेच, गेल्या वर्षीच्या थकीत अनुदानामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहयीत महाविद्यालये आणि समन्वयक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना त्वरित मागील अनुदान मिळण्यासाठी आग्रह धरण्यात आला. सुमारे ५ कोटीचे हे अनुदान केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्वरित द्यावे अशी मागणी सागर वैद्य यांनी केली.
लवकरच थकीत अनुदान मिळेल
मागील थकबाकीसाठी व्यवस्थापन परिषद सदस्य राज्य सरकारकडे आणि कुलगुरू हे राज्यपाल यांच्याकडे आग्रह धरणार आहेत. लवकरच हे थकीत अनुदान मिळेल अशी आशा आहे. व्यवस्थापन परिषद बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सागर वैद्य, व्यवस्थापन परिषद सदस्य