नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील गंगापुर व दारणा धरण समुहातून जायकवाडीस सोडण्यात आलेले सुमारे ४०० दलघफु पाणी रोखण्यात आमदार देवयानी फरांदे यांना यश आले आहे.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातीलगंगापुर, दारणा, प्रवरा व मुळा धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी एकुण ८.६०३ टिएमसी पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांनी ३० ऑक्टोंबरला दिले होते. या आदेशाचे फेर नियोजन करून नव्याने आदेश दिल्यामुळे जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आलेले ४०० एमसीएफटी पाणी वाचवण्यास आमदार देवयानी फरांदे यांना यश आले आहे.
कार्यकारी संचालक, गोदावरी खोरे विकास महामंडळ यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मध्य नाशिक विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात याबाबत ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने पक्षकारांचे म्हणणे ऐकुन घेऊन पुढील सुनावणीची तारीख दिली होती. व पुढील आदिशा पर्यंत म्हणणे लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश दिले होते. तथापी २१ नोव्हेंबर रोजी याच आदेशाविरुद्ध नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कारखानदार यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका सादर केलेली होती सर्वोच्च न्यायालयाने याबाबतीत दिलासा न देता पुढील सुनावणीची तारीख १२ डिसेबर अशी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलासा न दिल्याने कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांनी २४ नोव्हेंहकसा क्षेत्रिय अधिका-यांना वरील धरणांमधून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता दारणा व निळवंडे धरणामधून पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली. गंगापूर धरणातून देखील पाणी सोडण्यात आलेले होते. तथापी आमदार सौ. देवयानी फरांदे यांनी हार न मानता जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा अधिका-यांकडे सातत्याने पाठपुरावा करत गंगापुर व दारणा धरणातुन पाणी सोडल्यास शहराला व द्राक्ष शेतीला पाणी संकटाला सामोरे जावे लागेल अशी भुमिका मांडली. नदीप्रवाहात पण वाढ होऊन नदी वहन व्यय कमी होत असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबतीत आमदार देवयानी फरांदे यांनी पुन्हा जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना याबाबतीत कार्यकारी संचालक यांना अहवाल सादर करण्याविषयी चर्चा केली.
त्यांच्या या मागणीला यश येऊन कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर यांनी २८ नोव्हेंबर रोजी सुधारीत आदेश काढून गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडले गेले असल्यामुळे सदर पाणी बंद करून चारशे एमसीएमटी पाणी धरंगापूर धरणात वाचवण्यात यश आलेले आहे. दुसऱ्यांदा आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूर धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करून नाशिक जिल्ह्याचे पाणी वाचवलेले आहे याबाबत शेतकरी व लाभधारकांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानले आहेत.
आमदार देवयानी फरांदे यांनी ४०० एमसीएफटी पाणी वाचवल्यामुळे आता नाशिक शहरात पाणी कपात करण्याची गरज भासणार नाही