येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्याच्या सोमठानदेश गावात नुकसानग्रस्त भागांची पाहणीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा दाखल झाल्यानंतर येथील गावातील मराठा आंदोलकांनी विरोध केला . यावेळी भुजबळ गो बँकच्या घोषणा आंदोलनकांनी दिल्या. गावात गाडीच्या ताफा दाखल झाल्यानंतर या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर भुजबळ ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर सकल मराठा आंदोलकांनी त्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडत रस्ता पवित्र केल्याचा दावा केला.
मंत्री भुजबळ कालच नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आज ते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसीनीची पाहणी करण्यासाठी गेले. त्यात त्यांना हा विरोधाचा सामना सोमठानदेश या गावात करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील व भुजबळ यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. त्यातून भुजबळ यांना ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामना करावा लागत आहे. आज त्यांच्याच येवला विधानसभा मतदार संघात या विरोधाचे पडसाड उमटले.