येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्याच्या सोमठानदेश गावात नुकसानग्रस्त भागांची पाहणीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा दाखल झाल्यानंतर येथील गावातील मराठा आंदोलकांनी केला विरोध. यावेळी भुजबळ गो बँकच्या घोषणा आंदोलनकांनी दिल्या. गावात गाडीच्या ताफा दाखल झाल्यानंतर या घोषणा देण्यात आल्या.
मंत्री भुजबळ कालच नाशिकला दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर आज ते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसीनीची पाहणी करण्यासाठी गेले. त्यात त्यांना हा विरोधाचा सामना सोमठानदेश या गावात करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील व भुजबळ यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. त्यातून भुजबळ यांना ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामना करावा लागत आहे. आज त्यांच्याच येवला विधानसभा मतदार संघात या विरोधाचे पडसाड उमटले.