पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोथरूड येथील गोसावी वस्ती जवळ लहान भाऊ छेड काढत असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्यानेच जबरदस्तीने बलात्कार केला. याप्रकरणी किशोर परमेश्वर केदार आणि नकुल परमेश्वर केदार या दोघा सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई केली.
अल्पवयीन मुलगी क्लासला जात असताना लहानभाऊ नकुल केदार याने तिची छेड काढली. या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित मुलगी मोठा भाऊ किशोर केदारकडे केली. पण, किशोर केदारने माझ्या भावाची तक्रार करते काय असे सांगत या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर या मुलीला धमकी सुध्दा दिली. मी ज्यावेळेस बोलवेल त्यावेळेस यायचे नाही असे सांगितले.
या सर्व प्रकारामुळे अल्पवयीन तरुणी घाबरली व तीने आपबित्ती पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी या अल्पवयीन मुलीला पोलिस स्थानकात नेले. या ठिकाणी तक्रार दाखल केल्यानंतर अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.