इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड नगर पालिकेचे माजी थेट नगराध्यक्ष व जेष्ठ शिवसैनिक दिलीप सोळसे (६७) यांचे निधन झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. मनमाड नगरपालिकेत ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांची कारकिर्दित त्यांनी अनेक विकास कामे करत लोकांच्या मनात घर केले होते.
त्यांना रविवारी नाशिकला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांची अंतयात्रा सोमवारी सकाळी ११ वाजता कॅम्प भागातील त्यांच्या वेलंकिनी नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. शिवसेनेते फुट पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे यांच्या गटात राहणेच पसंत केले.
थेट नगराध्यक्ष पदाअगोदही ते नगरसेवक म्हणून अनेक वेळा निवडून आले. सर्वसामान्य लोकांशी त्यांचा मोठा संपर्क होता. कोणत्याही विषयावर परखडपणे बोलणे व त्या विषयाची सोडवणूक करण्यात ते अग्रेसर असत.