नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नविन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २४ मधील लेखानगर जलकुंभास मोठया प्रमाणात पाणी गळती सुरु आहे. सदर जलकुंभाचे दुरुस्तीचे व जलकुंभाचे वॉटर प्रुफिंग करणेचे काम तातडीने सुरु करणे आवश्यक असल्याने पाणी पुरवठा विभागामार्फत लेखानगर जलकुंभ दुरुस्तीचे व वॉटर प्रुफिंग करणेचे काम ४ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ पर्यंत करण्यात येणार आहे.
सदर कामाचे कालावधीत सदर भागात बायपासने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी देखील लेखानगर जलकुंभावरुन खालील भागामध्ये होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
प्र क्र २४ मधील लेखानगर जलकुंभ परिसर
स्टेट बैंक कॉलनी, पिरबाबाचौक, राणाप्रताप चौकातील भाग, मृत्यूंजय महादेव,मंदिर, झिनत कॉलनी, इंदिरा नगर वसाहत १, २, बालभारती, तुळजाभवानी चौक, जुने सिडको शिवाजीचौक परिसर, अचानकचौक, सारंगचौक, वंदेमातरमचौक, शनि मंदिर परिसर, एन-३ एल सेक्टर, एन-९ पीजीर, लेखानगर मिलटरी कॉलनी, गजानन चौक, सप्तश्रृंगी चौक परिसर, महादेवचौक, खंडेराव परिसर, गोपाळकृष्णचौक हा परिसर आहे. तरी लेखानगर जकुंभाचे दुरुस्तीचे व वॉटरप्रुफिंग करणेचे काम सुरु असे पर्यंत परीसरातील नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.