वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
करोडपती व्हावं, असं कोणाला नाही वाटणार? संपूर्ण आयुष्य प्रयत्न केले तरी करोडपती होण्याचं सौभाग्य फारच कमी लोकांच्या नशिबात असतं. पण हरियाणाच्या एका मुलांना ते स्वप्न केवळ १४ वर्षे वयातच खरं करून दाखवलंय.
कौन बनेगा करोडपती या शोच्या इतिहासामध्ये मयांक या केवळ १४ वर्षाच्या मुलाने एक कोटी रुपये जिंकले आहेत .त्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. केबीसीच्या जुनियर वीक मध्ये मयांकने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्याच्या खेळाने त्याने सर्वांना थक्क करून सोडले. स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा मयांकची बुद्धिमत्ता पाहून चकित झाले.
मयंकने केबीसी जुनियर मध्ये बुद्धिमत्तेच्या जोरावर कमी वयात जी प्रसिद्धी मिळवली आणि हरियाणाचं नाव उंचावलं त्याचं कौतुक हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सुद्धा केले व त्याचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून म्हटले की, मयंक लाल, महेंद्रगड, हरियाणातील इयत्ता ८ वीचा हुशार विद्यार्थी, याने KBC ज्युनियरमध्ये आपल्या ज्ञान आणि कौशल्याने १ कोटी रुपये जिंकून राज्याचे नाव उंचावले आहे. प्रतिभावान मुलाच्या वडिलांशी फोनवर बोलून त्यांचे अभिनंदन केले आणि मयंकला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.