इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाचा कोच बदलणार अशी चर्चा असतांनाच आज बीबीसीआयने मोठी घोषणा करत राहलु द्रविडचं भारतीय संघाचा मुख्य कोच राहणार असल्याचे जाहीर केले. त्याची आज अधिकृत घोषणाही केली. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टापचा कालवधी वाढवण्यात आल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपल्यामुळे कोच बदलणार ही चर्चा होती. पण, बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल द्रविड यानेही ही ऑफर स्विकारल्यामुळे बीसीसीआयने आज घोषणा केली.
व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचा कोच होईल अशी चर्चा होती. पण, तो एनसीए प्रमुख म्हणूनच काम पाहणार आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत तो मात्र भारतीय संघाला धडे देणार आहे. राहुल द्रविडच्या काळातच भारतीय संघाने विश्वचषकातील अंतिम सामना सोडून सर्वच सामने जिंकले. त्यानंतर अनेक विश्वविक्रमही खेळाडूंनी नोंदवले. या सर्व कामांची दखल घेऊन द्रविडला ही पुन्हा संधी मिळाल्याचे बोलले जात आहे.