चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यासह अन्य भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेसचे नेत माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात हे चांदवड आणि निफाड तालूक्याच्या दौ-यावर असून सकाळी त्यांनी चांदवड तालूक्यातील बहादुरी येथे नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी द्राक्ष बागाईतदारांना दिलासा देत येत्या अधिवेशनात नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत मिळावी यासाठी अधिवेशनात मागणी करत शेतक-यांची बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले. तर नुकसानग्रस्त शेतक-यांना सरकारकडून दिलासा मिळणे आवश्यक होते पण सरकारचे प्रमुख दुस-या राज्यात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याच सांगत सरकारला टोला लगावला.
काल मंत्री अनिल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांची भेट घेत पाहणी केली. त्याअगोदर पालकमंत्री दादा भुसे बांधावर जाऊन आले. त्यानंतर आज काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली.