नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व Dcp,सर्व Acp,सर्व Srpi आणि अधिकारी, अंमलदार यांनी कोंबिंग ऑपरेशन व ऑल आऊट मोहीम सुरू केली आहे. यात मंगळवारी रात्री ५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य किंवा उपद्रव केल्यास तात्काळ कारवाई होईल. सावध व्हा.! असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी ही मोहिम सुरु केली आहे. गेल्या काही महिन्यात शहरात गुन्हेगारींचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पोलिसही आता अॅक्शन मोडवर आहे.
या मोहिमेमुळे आता गुन्हेगारीला किती वचक बसतो हे येत्या काही दिवसात कळेल. पण, अशा मोहिमा वारंवार कराव्या लागणार आहे. या ऑल आऊट ऑपरेशनचा एक व्हिडिओ सुध्दा पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नागरिकांनी प्रतिक्रिया सुध्दा दिल्या आहे.