येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दूध दराबाबत प्रहार संघटनेतर्फे येवला तालूक्यातील एरंगाव येथे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत अनोखे प्रतिकात्मक आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला.
सध्या दूध दर वाढीचा प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक झाले आहे. दुधाला २५ रुपयांचा दर मिळत असून दुष्काळी परिस्थिती, महागलेला चार वाढलेले पशुखाद्याचे दर यामुळे उत्पादन खर्च भरुन निघत नसल्याने सरकारने दुधाच्या दरात वाढ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर दुधाच्या दरवाढीचा प्रश्न पेटला आहे. कालच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुध्दा एक पत्र लिहले आहे. त्यात त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधेल. तर राज्यात इतरत्रही वेगवेगळे आंदोलन केले जात आहे.