इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाच दिवसाच्या मालिकेतील तिस-या टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून पराभव केला. पहिले दोन सामने भारताने जिंकल्यानंतर तिसरा सामनाही भारत जिंकून मालिका खिशात घालेल असे सर्वांना वाटत होते. पण, भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यात भारत आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा विक्रमही करणार होता. पण, तोही आता लांबला.
या सामन्यात ऋतुराज गायकडवाडची शतकी खेळी मात्र लक्षवेधी राहिली. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासठी तीन गडी गमावत २२३ धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने डगमगतच फलंदाजी केली. पण, शेवटी त्यांनी डाव सावरत हा सामना जिंकला. मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने नाबाद शतकी खेळीसह संघाला विजय मिळवून दिला. त्याने ४८ चेंडूत १०४ धावा केल्या.
या सामन्यात भारती संघाने ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत १२३ धावा केल्या. सूर्यकुमार २९ चेंडूत ३९ धावा केल्या. तर तिलक वर्माने २४ चेंडूत ३१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि एरॉन हार्डी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
आता दोन सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या दोन सामन्यापैकी एकही सामना भारताने जिंकला तर मालिका भारत जिंकले व विक्रमही भारताच्या नावावर होणार आहे.