इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लग्न ठरले की प्री वेडिंग शुटींग आता नवीन राहिले नाही. पण, थेट सुहाग रातचा व्हिडिओ शुट करणे हे मात्र नवीन आहे. विशेष म्हणजे हा शुट केलेला व्हिडिओ थेट सोशल मीडियावर शेअर करणे त्यापेक्षा धक्कादायक आहे. पण, एका जोडप्याने आपल्या या विशेष रात्रीचाच व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे त्यावर अनेकांनी कॅामेंटही केले आहे. काहींना ही गोष्ट रुचली नसली तरी आता ही फॅशन पुढे ट्रेंड होईल का काय असेच दिसत आहे. खरं तर लग्नानंतर पहिली रात्र ही नवीन जोडप्यांसाठी खास असते. त्यासाठी आपल्या रुमची विशेष सजावट केली जाते. काही तर लग्नाची रात्रीसाठी मोठ मोठे हॅाटेलमधील रुम बुक करतात. त्यावरही हजारो रुपये खर्च केले जाते.
पण, या रात्रीची गोष्ट खासगी असते. त्यामुळे ती कधी सार्वजनिक करत नाही. पण, या जोडप्याने ती सार्वजनिक केली. त्यामुळे ती अनेकांना रुचली नाही. पण, नवीन पिढीला ती कोणाला आवडो न आवडो त्यांना त्याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे असे व्हिडिओ पुन्हा दिसले तर त्यात नवल नाही.