नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व Dcp,सर्व Acp,सर्व Srpi आणि अधिकारी, अंमलदार यांनी कोंबिंग ऑपरेशन व ऑल आऊट मोहीम सुरू केली आहे. यात गुन्हेगार, टवाळखोर यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा यासाठी ही मोहिम सुरु केली आहे. गेल्या काही महिन्यात शहरात गुन्हेगारींचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पोलिसही आता अॅक्शन मोडवर आहे.
या मोहिमेमुळे आता गुन्हेगारीला किती वचक बसतो हे येत्या काही दिवसात कळेल. पण, अशा मोहिमा वारंवार कराव्या लागणार आहे.