इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने दिव्यांग कार्ड असणार्या प्रवाशांना बसमधून मोफत प्रवास देण्यात येतो. त्याबरोबरच आपले कामकाज अधिक पारदर्शकरित्या करण्याकरिता सिटीलिंक नेहमीच वेगवेगळ्या उपाययोजना करीत असते त्याचाच एक भाग म्हणून सिटीलिंकच्यावतीने दिव्यांग प्रवाशांना RFID कार्डचे वितरण करण्यात येत आहे. परंतु यासंदर्भात वारंवार माहिती देऊनही सदर RFID कार्ड घेण्याकरीता अद्यापही दिव्यांग प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढळून येत आहे. सद्यस्थितीत आजपावेतो केवळ ६२५ दिव्यांग प्रवाश्यांनी RFID कार्ड काढून घेतले आहे.
सिटीलिंक पुन्हा एकदा दिव्यांग प्रवाश्यांना कळवू इच्छिते की, दिनांक १ जानेवारी २०२४ पासून RFID कार्ड हे प्रत्येक दिव्यांग प्रवाश्याला अनिवार्य असणार आहे. १ जानेवारी पासून ज्या प्रवाश्यांकडे RFID कार्ड नाही अश्या प्रवाश्यांना सिटीलिंक बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे १ जानेवारीपासून मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा असेल तर आजच दिव्यांग प्रवाश्यांनी RFID कार्ड काढून घ्यावे.
सिटीलिंक भवन, वीर सावरकर जलतरण तलावसमोर, त्र्यंबकरोड, नाशिक याठिकाणी RFID कार्ड वितरित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ऐनवेळी होणारी गर्दी टाळण्याकरिता दिव्यांग प्रवाश्यांनी लवकरात लवकर RFID कार्ड काढून घ्यावे व सिटीलिंक मधून मोफत प्रवासाचा लाभ घ्यावा. यासंदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास कृपया ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.