इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तराखंडमधील उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्याल ४१ मजुरांची अखेर १७ दिवसांनी सुटका झाली आहे. १२ नोव्हेंबरपासून हे मजुर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. या या रेस्क्यू ऑपरेशनकडे देशासह जगाच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या कामगारांना बाहरे काढण्यात यश आले आहे.
हे सर्व कामगार टप्याटप्याने काढले जात आहे. पहिले काही कामगार बाहेर आले. त्यानंतर आता सर्वच कामगारांना काढण्यात आले आहे.
सायंकाळीच बचाव कार्याबाबत महत्वाची अद्ययावत माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्यात
एनचआयडीसीएलचे जीवनरक्षणासाठीचे प्रयत्न:
ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे ठराविक अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत. एसडीआरएफने उपलब्ध मनुष्यबळासह व्हिडिओ संप्रेषण स्थापित केले आहे आणि एनडीआरएफने थेट लाईन संपर्क स्थापित केला आहे.
- एनएचआयडीसीएल द्वारे हॉरीझॉन्टल बोरिंग (आडवे खोदकाम)
आतापर्यंत एकूण 58 मीटर पर्यंत पाईप आत ढकलण्यात आला आहे.
3.सतलज जल विद्युत निगम- द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग (उभे खोदकाम) (1.0 मीटर व्यास):
ड्रिलिंग काम सुरू झाले असून वार्तांकनाच्या वेळेपर्यंत 45 मीटर चे काम पूर्ण झाले.
4.टीएचडीसीएल द्वारे बरकोट बाजूला आडवे ड्रिलिंग:
टीएचडीसी ने बरकोट बाजूला बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे.
28.11.2023 रोजी 0500 वाजता सातवा स्फोट करण्यात आला.
बोगद्याची एकूण निष्पादित लांबी 13.20 मीटर आहे. पुढे, खोदकाम सुरु आहे.
18 रीब्सच्या फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.
5.आरव्हीएनएल द्वारे लंब-क्षैतिज ड्रिलिंग:
मजुरांना वाचवण्यासाठी आडव्या ड्रिलिंगसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म बोगद्यासाठी लागणारी उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.प्लॅटफॉर्म बनवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मजबुतीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
6.सिल्क्यरा टोकाला आरव्हीएनएल द्वारे उभे ड्रिलिंग (8 इंच व्यास):
बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणि आरव्हीएनएल ला सुपूर्द केला आहे. ड्रिलिंगसाठी बीआरओ ने घटनास्थळी मशीन आणले.
आरव्हीएनएल ला विद्युत जोडणी प्रदान करण्यात आली आहे.
उभ्या ड्रिलिंगसाठी प्लॅटफॉर्म पूर्ण झाला आहे.
26.11.2023 रोजी 0400 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 72 मीटर काम पूर्ण झाले.
7.ओएनजीसी द्वारे बरकोट टोकाकडे उभे ड्रिलिंग (24 इंच व्यास).
ओएनजीसी ने पुरवलेली एअर हॅमर ड्रिलिंग रिगची सर्व संबंधित सामग्री ऋषिकेश येथे पोहोचली आहे, कारण ड्रिलिंगसाठी रिग ठेवण्यासाठी बीआरओ द्वारे मार्ग आणि जागा तयार केली जात आहे.
8.टीएचडीसीएल/लष्कर/कोल इंडिया आणि एनएचआयडीसीएल च्या संयुक्त टीमद्वारे मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेल:
22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.