नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुसरी बायको करतो असे सांगत पत्नीच्या अंगावर रॅाकेल ओतून पेटती काडी अंगावर टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पतीला न्यायालयाने आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावणी
अंबड पोलीस ठाणे हददीत १९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी १० वाजता सिडको येथे हा गुन्हा घडला होता. या गुन्हयातील आरोपी प्रकाश काशिनाथ पाटोळे, वय ३७ वर्षे याने त्याची पत्नी फिर्यादी हिचे चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करून ‘मी दुसरी बायको करतो’ असे म्हणून एका हाताने फिर्यादीचे तोंड दाबून फिर्यादीचे अंगावर रॉकेल ओतुन पेटती काडी फिर्यादीचे अंगावर टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन आरोपीविरुध्द अंबड पोलीस ठाणे येथे भादंवि. कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक, एम एम गावीत, तत्कालीन नेमणूक अंबड पोलीस ठाणे, नाशिक शहर, यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरूध्द सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने मेहनत घेऊन अतिशय चिकाटीने तपास केला व आरोपीविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते, सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, नाशिक येथे सुरू होती.
आज जिल्हा न्यायाधीश -१ व अति. सत्र न्यायाधीश श्रीमती मृदुला भाटीया यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतांस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये शिक्षा सुनावलेली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता म्हणून श्रीमती रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले तसेच पैरवी अधिकारी म्हणुन ए.एस.आय. आण्णा कुवर यांनी पाठपुरावा केला.