नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएयशनच्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आणि विभागीय क्रीडा संकुल यांच्या सहकार्याने आणि मार्गर्दर्शनाखाली नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, हिरवाडी रोड येथे दिनांक ०२ आणि ०३ डिसेंबर,२०२३ रोजी मिनी आणि युथ मुले आणि मुली या दोन गटांच्या नाशिक जिल्हा आजिक्यपद स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. मिनी गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००१० किवा त्यानंतरची असावी तर युथ गटासाठी खेळाडूंची जन्म तारीख १ जानेवारी २००३ किवा त्यानंतरची असावी.
या स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू दिनांक १६ आणि १७ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान ठाणे येथे आयोजित २५ व्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या जिल्हा स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक ०२ डिसेम्बर रोजी दुपारी ०३. ०० वाजता संपन्न होईल. त्यानंतर स्पर्धांना सुरवात होणार आहे. तर रविवारी सकाळी ०८.०० ते १.०० आणआणि दुपारी ०३.०० ते ०५.०० या वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू/प्रशिक्षक यांनी किरण घोलप– मो.क्र. ९५४५५९१९४४, मनोज म्हस्के मो क्र ९७६४०८७०३३, गणेश कलुगल मो. क्र. ९७६७३६८१४३, बंडू जमदाडे मो. क्र. ९६८९४७८१४९, प्रज्वल पिंपळकर मो. क्र.७७७०००१५३४ यांच्याशी संपर्क करावा. तरी या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे अवाहन नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात येत आहे.