नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थिंक फसवणूक प्रकरणात ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. मालेगाव न्यायालयाने आज त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे अद्वय हिरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोमवारी तब्बल दोन तास दोन्ही वकिलांकडून युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यावरील निकाल राखून ठेवाला होता. तो आज दिला. रेणुका सुत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वय हिरे यांना अटक केल्यानंतर त्यांना अगोदर पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत देण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांना जामीन मिळेल असा आशावाद हिरे समर्थकांना होता. पण, न्यायालयाने कोणताच दिलासा मिळाला नाही.