इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस बेपर्वाईने प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो; असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक असल्याचा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला. आज त्यांनी पत्रकार परिषदेत घेत विविध विषयावर त्यांनी आपली भूमिका मांडली. दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत? असा प्रश्नही त्यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे; मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार? महाराष्ट्रात निवडणुका आल्यावर जर तुमच्या तिजोरीची दारं उघडणार असतील, तर तोपर्यंत महाराष्ट्राची जबाबदारी कोण घेणार? रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी घटनाबाह्य सरकार म्हणजे, दुष्काळातला तेरावा महिना. ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार?
मी शिवसैनिकांना आवाहन करतो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांना दिलासा द्या. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करतांना म्हटले की तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा! भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवर, आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय!
बघा संपूर्ण पत्रकार परिषद….