इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापुर ,कडवा ,मुकणे जलाशयातून जायकवाडी धरणासाठी पाणी सोडल्यानंतर आता जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी इतके पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले. या आदेशात मुळा प्रकल्पातून २.१०, प्रवरा (भंडारदरा, निळवंडे) प्रकल्पातून ३.३६, गंगापूर धरणातून (कश्यपी, गोदावरी), ०.५, गोदावरी दारणा (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) प्रकल्पातून २.६४३ टीएमसी असे एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडावे असल्याचे म्हटले होते.
समन्वय पाणी वाटप कायद्यानुसार अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात आले असले तरी पाच टीएमसीच पाणी जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. त्यामुळे ३५ टक्के पाणी वाया जाणार आहे. पाच टीएमसी पाणी आल्यावर जायकवाडी धरणाची पाणीपातळी ४४ ते ४५ टक्क्यांपर्यंत पाणीपातळी वाढणार आहे. हे पाणी सोडल्यामुळे नाशिक जिल्हयातील काही धरणाचा पाणी साठा कमी होणार आहे.