इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसीचा जनक मी असल्याचा दावा करत भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मानले नाहीत. जरा इतिहास सुधारून घ्या मग कळेल, ओबीसीचा जनक मी आहे.
पुणे येथे महात्मा फुले वाडा येथे भेट दिल्यानंतर त्यांनी पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेस ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात कधीही दंगली होऊ शकतात. स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. ३ डिसेंबर नंतर देशातील परिस्थिती बिघडणार आहे. लोक दंगल कशी होईल अशी परिस्थिती निर्माण करत आहेत.
यावेळी त्यांनी आंबेडकरवाद – फुलेवाद – शाहुवाद याला कोणा व्यक्तीची गरज नाही या विचारातच खूप मोठी ताकद आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती लढ्याला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकबाबत बोलतांना ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी ४ महिने बाकी आहेत तोपर्यंत त्रास सहन करा, त्यानंतर सरकार कोणाचं येईल हे सांगता येणार नाही मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाही.
पॅलेस्टाईन – इस्रायल मध्ये बॉम्बींग सुरू आहे. तिथे असं दिसत आहे की, राजकीय नेतृत्व इस्रायलच्या बाजूने आहे तर, परराष्ट्रीय सचिव हे पॅलेस्टाईन सोबत आहेत. तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटना बैठक मुंबईमध्ये झाली. ८ डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषय आझाद मैदानावर सभा घेणार आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही ते म्हणाले.