मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रंगभूमीवर ‘नथुराम’ विरुद्ध ‘नथुराम ‘! शरद पोंक्षेंनी नाटकाचे शीर्षक पळविल्याचा निर्माते उदय धुरत यांचा गंभीर आरोप

ऑक्टोबर 1, 2023 | 7:45 pm
in संमिश्र वार्ता
0
Adv A L GORE UDAY DHURAT VIVEK APTE SAURABH GOKHALE

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मराठी रंगभूमीच्या इतिहासात गेल्या १५० वर्षात घडले नाही असे कृत्य ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या बहुचर्चित मराठी नाटकाच्या निमित्ताने घडत आहे, शीर्षकासह या नाटकाची संहिताच ढापण्याचा हा प्रकार घृणास्पद व निंदनीय आहे. प्रचंड मेहनत घेऊन, संशोधन करून दिवंगत जेष्ठ लेखक प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाच्या लिखाणाचे व शीर्षकाचे श्रेय या नाटकाद्वारे अभिनेता म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तीनेच(शरद पोंक्षे यांचे नाव घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत ) करावे हे मराठी रंगभूमीसाठी शोभनीय नाही. यामुळे चुकीचा पायंडा पडला जाईल आणि अनेक प्रतिभावंत नाटककारांचे श्रेय लाटण्याची परंपरा सुरु होईल अशी खंत निर्माते उदय धुरत व्यक्त करतात.

काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर प्रचंड वादग्रस्त ठरलेला ‘नथुराम गोडसे’ पुन्हा रंगभूमीवर येत आहे. एकाच वेळी येऊ घातलेल्या दोन नाटकांमुळे ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असे चित्र रंगभूमीवर दिसणार असून, त्यावरून वादाचे ‘प्रयोग’ रंगण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी रंगभूमीवर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे माऊली प्रॉडक्शनचे नाटक लवकरच पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. त्याचबरोबर या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत दिसलेले अभिनेते शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडेसे बोलतोय’ हे नाटक घेऊन येत असल्याचे जाहीर केले आहे. नाटकाचे शीर्षक जवळपास सारखे असल्याने त्यावरून न्यायालयीन लढाई सुरु झाली असून निर्माते उदय धुरत यांनी पोंक्षे यांना ७२ तासांचा कालावधी दिला असून जर त्यांनी माघार घेतली नाही तर कोर्टाची पायरी चढण्याची तयारी सुरु केली आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नाट्यनिर्माते उदय धुरत यांनी १० जुलै १९९८ साली माऊली प्रॉडक्शनतर्फे रंगभूमीवर आणले होते. या नाटकाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विनय आपटे यांनी केले होते. शरद पोंक्षे यांनी त्यात नथुरामची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका लोकप्रियही ठरली होती. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक खूप चर्चेत राहिले. नाटकाचे ८१६ प्रयोग झाल्यानंतर २०१६ मध्ये निर्माते धुरत यांनी हे नाटक थांबविण्याचा निर्णय घेतला.

नाट्यनिर्माते धुरत ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. विवेक आपटे याचे दिग्दर्शन करीत असून, त्याच्या तालमी ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. या नाटकात ‘नथुराम’च्या भूमिकेत अभिनेता सौरभ गोखले दिसणार आहे. हे नाटक ऑक्टोबरमध्ये येणार असल्याची जाहिरात जुलैमध्ये वर्तमानत्रांत प्रसिद्ध झाली होती. ‘नथुरामच्या भूमिकेतील कलाकाराचे नाव निश्चित झाल्यानंतर आता नाटकाच्या तालमी सुरू होत आहेत. नोव्हेंबरमध्ये हे नाटक रंगभूमीवर येईल’, असे दिग्दर्शक विवेक आपटे यांनी सांगितले.

आमच्या माऊली प्रॉडक्शन्सची जाहिरात पाहून शरद पोंक्षे यांनी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाची लेखक दिग्दर्शकाचे नाव नसलेली जाहिरात १५ ऑगस्टला प्रसिद्ध केली. पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत असून, नाटकाचे ५० प्रयोग होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ‘एवढ्या मोठ्या कलाकाराला एका ज्येष्ठ नाटककाराच्या संहितेची – शीर्षकाची गरज का भासली? नाटकाच्या संहिता – शीर्षकावरून न्यायालयीन लढाई होईल’, असे धुरत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या संदर्भात धुरत यांच्याकडून पोंक्षे यांना आतापर्यंत तीन नोटिसा पाठविण्यात आल्या असून शेवटच्या नोटीसची मुदत ७२ तासांची आहे. या पत्रकार परिषेदेत कायदेशीर माहिती जेष्ठ वकील ए. एल. गोरे यांनी दिली.

नवा नथुराम कोण?
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक नव्याने रंगभूमीवर येत असताना ‘नथुराम’च्या भूमिकेचे आव्हान कोण पेलणार याविषयी उत्सुकता होती. नथुरामच्या भूमिकेसाठी सुमारे २५-३० कलाकारांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यानंतर अभिनेता सौरभ गोखलेची निवड झाली. सौरभ ही आव्हानात्मक भूमिका कशी साकारणार याकडे नाट्यरसिकांसह नाट्यसृष्टीचे लक्ष असेल.
वि-ट्रान्फरची लिंक सोबत देत आहे आपल्या चॅनेलसाठी हे व्हिडीओ तातडीने डाऊन लोड करावेत ही विनंती,
Download link निर्माता – दिग्दर्शक कलाकार बाईट्स
https://we.tl/t-l610NErN5O
Download link – सौरभ गोखले – नवा नथुराम एंट्री शॉट्स
https://we.tl/t-9ylUSJKKn0

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक… आईनेच ठेवले अल्पवयीन मुलासोबत संबंध… असे झाले उघड

Next Post

राज्यात स्वच्छता अभियानात नागरी भागात १६ लाख नागरिकांचा सहभाग, १९४२ टन कचरा जमा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
unnamed 82 1

राज्यात स्वच्छता अभियानात नागरी भागात १६ लाख नागरिकांचा सहभाग, १९४२ टन कचरा जमा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011