गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धर्मवीर-२ या चित्रपटाचा मुहूर्त शुभारंभ..,,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हे नेते व कलाकार होते उपस्थितीत

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 27, 2023 | 11:55 pm
in संमिश्र वार्ता
0
unnamed 2023 11 27T235410.870 e1701109507708


ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. दिघे साहेबांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

धर्मवीर-२ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, झी-24 चे मंगेश कुलकर्णी, धर्मवीर-2 चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांनी सर्वप्रथम धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या धर्मवीर १ व २ चे सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तांत्रिक सदस्य, अशा सर्व टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्वस्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. त्यांच्याच संस्कारावर व शिकवणीवर आपले शासन काम करीत आहे. गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून अनेक गरजूंना काम मिळणार आहे. समृद्धी महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याच्या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात यशस्वीपणे राबविला. आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळते, त्याप्रमाणे हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करीत काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले. सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि धर्मवीर स्व.दिघे साहेबांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर त्यांच्या हस्ते मुहूर्ताची पूजा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रस्तावना करताना चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांची भूमिका साकारलेल्या श्री. प्रसाद ओक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने… वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई

Next Post

दुचाकीच्या धडकेने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू… दुचाकीस्वार फरार

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
accident 11
क्राईम डायरी

अज्ञात चारचाकीने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार…नाशिक येथील घटना

सप्टेंबर 18, 2025
crime114
क्राईम डायरी

मैत्रिणीशी लग्न केले म्हणून टोळक्याने तरूणाचे अपहरण करुन लुटले…त्र्यंबरोड भागातील घटना

सप्टेंबर 18, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे…रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यावर टीका

सप्टेंबर 18, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
Next Post
accident 11

दुचाकीच्या धडकेने जेष्ठ नागरिकाचा मृत्यू… दुचाकीस्वार फरार

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011