इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मंगळवारी करणार आहे.
त्यांचा सकाळी १० ते दुपारी १.३० पर्यंत हा दौरा आहे. सकाळी १० वाजेपासून पिंपळगाव बसवंत येथून दौरा सुरु होईल. त्यानतंर ते मौजे रोळस, मौजे पिंप्री व कसबे सुकणे येथे जातील. त्यानंतर दुपारी १२ ते १ ते जिल्हाधिकारी कार्यालयात गारपीठामुळे झालेल्या नुकसानीच्या आढावा बैठकीत उपस्थितीत राहणार आहे.
आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे पाहणी करणार आहे. नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी पाटील यांचा दौरा महत्त्वाचा आहे.