इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
मुंबई – मुलगा आणि आई यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे असते, हे जग जाहीर आहे. मात्र एका महिलेने विकृत मनोवृत्तीतून आपल्या लहान मुलासोबत नैसर्गिक संबंध ठेवले, इतकेच नव्हे तर तिच्या बहिणीने म्हणजे मुलाच्या मावशीने देखील असाच भयानक वाईट प्रकार केला. त्यामुळे त्या मुलाला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास झाला. या संदर्भात त्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. या मुलांचे आई-वडील विशेष म्हणजे या मुलाचे आई-वडील दोघेही वेगळे राहतात. हा मुलगा आईकडे राहत असताना हा प्रकार घडला. त्या महिलेच्या प्रियकरांनीही या लहानग्या मुलाला त्रास दिल्याचे उघड झाले आहे.
मुलगा बनला मानसिक धक्क्याने रुग्ण
खरे म्हणजे एखादी आई त्याच्या लहान मुलाचे लैंगिक शोषण करेल याची कुणीही कल्पना करू शकत नाही. परंतु अलीकडच्या काळात काय घडल्याचा नेम नाही त्यातूनच अशा विकृत घटना घडतात या विकृत महिलेने स्वत:च्या मुलासोबत अनैसर्गिक संबंध ठेवले. मुंबईत एका उपनगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने प्रियकरासोबत मिळून स्वत:च्या मुलाला इतका शारीरिक व मानसिक त्रास की हा मुलगा मानसिक रुग्ण बनला आहे. त्यानंतर आता १३ वर्षीय मुलाची डायरी त्याच्या वडिलांच्या हाती लागली तेव्हा या प्रकाराचा खुलासा झाला. वडिलांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आरोपी आई, तिची बहीण आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वडिलांनी केलेल्या चौकशीतून उघड झाला भयानक प्रकार
या मुलाचे वडील वेगळे राहत असल्याने त्यांनाही घटनेची काही माहिती नव्हती मात्र आपला मुलगा आजारी असल्याची कळल्यावर त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी केली केल्यानंतर हा प्रकार समोर आला. मला मुलाकडची डायरी सापडली. ज्यात मुलाने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं होते. ही डायरी वाचून मला धक्का बसला. त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
डायरी हे लिहले होते
मुलाने डायरीत लिहिले होते की, जेव्हा मी चौथीच्या वर्गात होतो तेव्हा माझ्या आईचे एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दोघे नेहमी एकमेकांसोबत संबंध ठेवायचे. त्यावेळी आई आणि त्या व्यक्तीने जबरदस्ती माझेही शोषण केले. इतकेच नाही तर जेव्हा आईची बहीण तिला संधी मिळायची तेव्हा तीदेखील माझे लैंगिक शोषण करत होती. मी या गोष्टीचा विरोध करायचो तेव्हा मला चटके दिले जायचे. पोलिसांनी तक्रारीवरून पॉक्सो अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी आईला अटक केली आहे. प्रियकर आणि बहिणीचा शोध घेतला जात आहे. या दोघांना अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे